मराठी व्याकरण
भाषा शास्त्र
स्वर
स्वरादी
व्यंजन
शब्दाच्या जाती भाग ०१
शब्दाच्या जाती भाग ०२
नाम
सर्वनाम
विशेषण ०१
विशेषण ०२
विशेषण ०३
विशेषण ०४
क्रियापद ०१
क्रियापद ०२
क्रियाविशेषण अव्यय ०१
क्रियाविशेषण अव्यय ०२
शब्दयोगी अव्यय ०१
शब्दयोगी अव्यय ०२
उभयान्वयी अव्यय ०१
उभयान्वयी अव्यय ०२
केवलप्रयोगी अव्यय
संधी ०१
संधी ०२-स्वरसंधी
संधी ३-व्यंजनसंधी
संधी - ४
संधी -०५
कृतीपत्रिका आराखडा
शब्दसिद्धी ०१
शब्दसिद्धी ०२
शब्दसिद्धी ०३
शब्दसिद्धी ०४
पत्रलेखन १
पत्रलेखन २
अभिनंदन पत्र
विनंती पत्र
मागणी पत्र
तक्रार पत्र
सारांश लेखन
बातमी लेखन
जाहिरात लेखन
अलंकार
नवरस
अकारविल्हे
विरामचिन्हे
गटात न बसणारा शब्द
एका शब्दाचे दोन अर्थ
लिंग
वचन
काळ व प्रकार ०१
काळ व प्रकार ०२
प्रयोग ०१
प्रयोग ०२
समास
अव्ययीभाव समास
तत्पुरुष समास
द्वंद्व समास
बहुव्रीहि समास
कर्मधारय समास
क्रियापदाचा अर्थ
क्रियापदाचे काळ
वाक्य प्रकार ०१
वाक्य प्रकार ०२
वाक्य प्रकार ०३
वाक्य संश्लेषण
1. भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, धीराने अपयशाला जिंकता येते तर माणुसकीने माणसाला जिंकता येते. 2. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही. 3. वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं.4. चलबिचल करणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो.5. आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्वाचे असते. 6. जीवनात कितीही वाईट प्रसंग येउद्या, चांगलं वागणं कधीच सोडू नका, विजय हा नेहमी सत्याचाच होतो. 7. एकत्र आलं की सुरुवात होते, सोबत राहिलं की प्रगती होते आणि एकत्र काम केलं की लवकर यश मिळते.8. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो.9. दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल मात्र माणसाला कोणता रंग लावावा म्हणजे त्याचामाणूस करता येईल. 10. ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि सय्यम असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो. 11. प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे. 12. कधीच कुणाला बेकाम समजू नये कारण बंद घड्याळसुद्धा दिवसातून दोन वेळा बरोबर वेळ दाखवते. 13. केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही तर बरीच नाती ही अहंकारानेसुद्धा तुटतात. 14. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच. 15. खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते. 16. सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात म्हणून बोलत चला. 17. स्वतः कमावलेल्या पैश्यानी एखादी वस्तू खरेदी करून बघा, तुमचे शौक आपोआप कमी होतील. 18. स्वतः कमावलेल्या पैश्यांनी फक्त गरजा पूर्ण होतात शौक नाही. 19. कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका कारण आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसूही शकते. 20. कुणालाच कमी समजू नका, ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरासुद्धा असू शकतो. 21. जी लोकं सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून सावध रहा. 22. लोकं आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झालात. 23. नातं तेव्हाच तोडा जेव्हा समोरच्यासुद्धा ते नको असेल.24. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून सुख न शोधता समाधान शोधा, आयुष्य खुप आनंदात जाईल. 25. इतरांठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा होऊ नका. 26. अश्या लोकांना शोधा, जे तुमच्यासोबत वेळ घालावण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. 27. “मी आहे ना, नको काळजी करू” असं म्हणणारी एक तरी व्यक्ती आयुष्यात असावी. 28. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात. 29. आयुष्यात वेळेला महत्त्व द्या, आणि तुम्हाला महत्व नाही तिथं चुकूनही वेळ देऊ नका. 30. कडू असणं ही कडुलिंबाची चूक नाही, चूक तर आपल्या जीभीची आहे जीला फक्त गोडच आवडते31. स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवाव लागेलच. 32. काहीतरी चांगलं करण्यासाठी वाईट परीस्थितीमधून जावंच लागते. 33. अनेकवेळा आलेले अपयश हे एका यशाने संपून जाते. 34. नशिबात नसलेली गोष्टसुद्धा मिळवता येते फक्त मनगटात ती मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते. 35. मोठमोठ्या गोष्टी करणारे लोकं मोठे नसतात, तर छोट्या-छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात. 36. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत रहा. काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल. 37. जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतात त्यांचे म्हातारपनातील दिवस खूप वाईट असतात. 38. जीवनातील वाईट काळच दाखवून देते की कोण हसतं, कोण दुर्लक्ष करत तर कोण सावरण्यासाठी येतं. 39. माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की त्याची वृत्ती आपोआप चांगली होते. 40. काय चुकलं हे शोधाणारे आयुष्यात पुढे जातात, कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात. 41. जास्त विचार करत बसलं की कृती करण्याची संभावना खूप कमी होऊन जाते. 42. पुस्तकामधील धड्यापेक्षा आयुष्याने दिलेलं धडे जास्त लवकर समजतात. 43. जेवढ्या उंच शिखरावर पोहचाल तेवढे सोबती कमी होतील. 44. लहान तळ्यासारखे गोड रहा, जिथं सिंहसुद्धा खाली मान घालून पाणी पितात.45. निंदा आणि टीका वाट्याला यायला हवी, फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत जातात.46. जीवनात प्रत्येक व्यक्ती महत्वाचा असतो कारण चांगले लोकं साथ देतात तर वाईट लोकं अनुभव देतात. 47. सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात. 48. फक्त संघर्षाच्या काळातच एकटं राहावं लागतं बाकी चांगल्या काळात सर्वच सोबत असतात. 49. दुसऱ्यांना अडचणीत आणून तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही. 50. काही लोकं आनंद मिळेल ते काम करतात तर काही लोकं मिळेल त्या कामात आनंद शोधतात.
0 Comments