अ ते ज्ञ
अंत:करण शुद्ध असावे.
आत्मा कुणाचाही दुखवू नये.
इच्छाशक्ती प्रबळ असावी.
ईमानदारीने काम करावे.
उपकार कुणाचाही घेऊ नये.
ऊठसूट कुणाकडेही जाऊ नये.
ए व ऐतखाऊ बनून जगू नये.
ऐकावे जनाचे करावे ज्ञानाचे.
ओझे कोणावर होऊ नये.
औकात कृतीतून व्यक्त करावी.
अं
अंदाजे तर्क वितर्क करू नये.
अ:
अ:! वा ! शब्द बोलावेत.
कपट मनी कधी असू नये.
खर तेच..........आपल म्हणावं.
गर्व.......... अहंकार करू नये.
घमेंड कशाचीही करू नये.
चमचेगिरी करू नये.
छळ कुणाचाही करू नये.
जपून जपून शब्द वापरावेत.
झर्‍यासारख निर्मळ असावं.
टणक असावे पोलादासारखे.
ठकास नेहमी महाठक असावे.
डर मनात बाळगू नये.
ढगांसारख प्रेम बरसाव.
ण ............ ऐकणार्‍यास शिकवू नये.
तक्रार करुनी जगू नये.
थंडपणा कामात असू नये.
दगडासम निर्दयी असू नये.
धनांत लालच असू नये.
नम्र शब्दातून मन जिंकावे.
पटकन हो .....नाही .....म्हणू नये.
फजिती कुणाचीही करू नये.
बडबड पेक्षा कृती करावी.
भय मनात बाळगू नये.
मजबूरीचा फायदा घेवू नये.
यशासाठी मनी तळमळ असावी.
रंग सरड्यासम बदलू नये.
लबाड संगत करू नये.
वजन कृतीतून सिद्ध कराव.
शहाणपणाने जीवन जगावे.
षड:यंत्र कधी रचू नये.
सहनशक्ती अंगी असावी.
हसून उपहास करू नये.
लबाडपणाने जगू नये.
क्ष
क्षमा मन,हृदयातून करावी.
ज्ञ
ज्ञान परीसाला अखंड स्मरावे.


....श्री. डामसे बाळू राणू 

सहशिक्षक,शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज - 8308503707

Post a Comment

0 Comments